Friendship is not about words, it is a connection created with trust, laughter and shared secrets. In Marathi culture, where emotions flow like poetry, expressing gratitude for a best friend through a heart touching poem for best friend in Marathi captures the essence of this beautiful relationship.
Full of words rooted to the heart, these kinds of poems are the songs of unbreakable bonds of friendship, which stand in the heart of true friendship.
Heart Touching Poem for Best Friend in Marathi

रोज भेटून गप्पा मारणं मैत्री नाही,
तर दूर राहूनही आठवण ठेवणं मैत्री आहे.
काट्यांवरून चालूनच फुले फुलतात,
विश्वासाच्या वाटेवरून चालूनच देव भेटतात.
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा,
सुखात सगळेच सोबत असतात,
पण दुःखात फक्त मित्र असतात.
मैत्री कधीच खास लोकांशी होत नाही…
ज्यांच्याशी होते, तेच लोक…
आयुष्यात खास होऊन जातात…!!
“जसे की तुम्ही”
माणसाने नेहमी सावली आणि आरशासारखे
मित्र बनवायला हवेत,
कारण सावली कधीच साथ सोडत नाही आणि
आरसा कधीच खोटं बोलत नाही.
अंतराने काही फरक पडत नाही,
गोष्ट प्रेमाच्या जवळीकीची असते,
मैत्री तर काही तुमच्यासारख्यांशी आहे, नाहीतर
ओळखी तर कित्येकांशी होतात!
एक चांगला मित्र मिळणं
तितकंच कठीण आहे,
जितकं वाळवंटात पाणी मिळणं.
मैत्री करणे प्रत्येकाच्या
बस ची गोष्ट नाही,
ती तोच करू शकतो
जो मनाने श्रीमंत आहे!
एक चांगला मित्र
आपली दुसरी ओळख असतो.
मैत्री हे एक असं बाग आहे,
जे फक्त निष्ठा आणि समजुतीने
लाखमोलाचं होतं!
Friendship Poem in Marathi – मैत्री कविता मराठी

मैत्रीच्या सहवासात
श्रम सारे विसरता येतात
पण खऱ्या मैत्रिणी मिळवण्यासाठी
काहीदा कितीतरी पावसाळे जातात.
तेज असावे सूर्यासारखे,
प्रखरता असावी चंद्रासारखी,
शीतलता असावी चांदण्यासारखी,
आणि मैत्री असावी तुझ्यासारखी.
एक तरी मैत्रीण असावी
बाईकवर मागे बसावी
जुनी हीरो होंडा सुद्धा मग
करिझ्माहून झकास दिसावी.
मैत्री म्हणजे,
कधी नितळ पाण्यावरील हळुवार तरंग
मैत्री म्हणजे,
कधी कधी स्वत:च पाण्यातील अंतरंग.
तुझ्या मनाला माझ्या मनाचा
रस्ता छान कळू दे..
मैत्रीच्या नात्याने दोघांचीही मग
ओंझळ पूर्ण भरू दे.
तुझी नि माझी मैत्री
जगाहून न्यारी आहे..
सगळे समजतात प्रेम
मला प्रेमाहून प्यारी आहे.
मैत्रीचे बंध
कधीच नसतात तुटणारे
जुन्या आठवणींना उजाळा देऊन
गालातल्या गालात हसणारे.
असे कितीतरी बंध
जुळले असतील तुझ्या आयुष्यात…
एक बंध माझ्याही मैत्रीचे
जपशील का शेवट पर्यंत तुझ्या मनात…
श्रावणसरीही मित्रा आता
परक्यासारख्या वागतात
ऊनपावसाच्या मतलबी खेळात
आपल्याच डोळ्यातून धावतात
मैत्रीमध्ये जरुरी नाही
दररोजची भेट,
ह्रदयाचा ह्रदयाशी
संवाद असता थेट.
Poetry Marathi Maitri – कविता मराठी मैत्री

मैत्री करत असाल तर
पाण्या सारखी निर्मळ
करा..
दूर वर जाऊन सुद्धा
क्षणों क्षणी आठवेल
अशी करा..
मैत्री करत असाल तर
चंद्र तारे यां सारखी अतूट
करा..
ओंजळीत घेवून सुद्धा
आकाशात न मावेल
अशी करा..
मैत्री करत असाल तर
दिव्यातल्या पणती सारखी
करा..
अंधारात जे प्रकाश देईल
हृदयात असं एक मंदीर
करा..
Also Read: New 75+ Aai Baba Quotes In Marathi | आई वडील शायरी मराठी
Friendship Poem Kusumagraj – मैत्री कविता कुसुमाग्रज

गवळ्याने दुधात पाणी घातलं होतं,
ते दूध माईनं चुलीवर ठेवलं होतं.
इकडे पातेल्यात मात्र निराळीच कहाणी होती,
दूध आणि पाण्याची मैत्री झाली होती.
पातेल्याची गर्मी वाढू लागली,
तशी दुधातल्या पाण्याची वाफ होऊ लागली.
हे पाहून दूध दु:खी झाला,
त्याने पाण्याला अटकाव केला.
सायीचा थर त्याने दिला ठेवून,
पाणी बिचारं त्यात बसलं अडकून.
इच्छा असताना त्याला दुधात राहता येईना,
सायीच्या भिंतीने बाहेर जाता येईना.
शेवटी कंटाळून दुधाला म्हणालं पाणी,
“जाऊ दे मला नाही तर नष्ट होऊ आपण दोन्ही. ”
पाण्याचे शब्द ऐकून दूध त्याला म्हणाला,
“मरणाची भीती नाही आपल्या मैत्रीला. ”
पाण्याने दुधाला खुप समजावलं,
पण दुधाने त्याचं एक नाही ऐकलं.
शेवटी दोघांनी एक निश्चय केला,
आणि त्यांना वेगळं करणारा जो अग्नी होता;
त्यालाच त्यांनी नष्ट केला.
Emotional Poem on Friendship in Marathi

मनात असतो विचारांचा काहूर
तरी शब्दा येत नाहीत ओठांवर
खूप काही सांगायचा असत
तेव्हा नसत कोणीही आपल्यासमोर
किती वेळा वाटत की आता
सोडून द्यावेत हे पाश मायेचे
पण नाही सुटत ते रेशमी बंध
आपल्याच नात्यातील कर्तव्याचे
रक्ताची नाती तर
“रेडीमेड” मिळतात
आणि बाकीची म्हणे
“कस्टमाइज़्ड” असतात
तरी “इट्स माइ चाय्स” हा
असतो निव्वळ एक भास
सगळा आधीच असत
“त्यानी” ठरवलेल खास
त्यातूनच मग जुळतात का
काहींचे सूर अनॉखे
आणि त्यालाच म्हणायचे का
आपण मैत्रीचे नाते?
Conclusion
A Heart touching poem for best friend in Marathi is not simply a poem it is an honor to the friendship which can never be replaced to brighten our life. Such poems are a way of showing appreciation, love, and appreciation to the best friend who can stand with us in all our happiness and tribulations through the beauty of Marathi lyrics.
These emotional and culture laden verses can always remind us of the great value that a genuine friend has in our lives and he can always be remembered and toasted.