Bhavpurna Shradhanjali In Marathi 2025: भावपूर्ण श्रद्धांजली

Bhavpurna Shradhanjali in Marathi is not a ritual but a deep sense of existence between the living and the dead. This emotional commemoration is a kind of commemoration of the deceased loved ones, and it has been regarded as culturally and emotionally important in the Marathi customs. 

The insight into the core nature of Bhavpurna Shradhanjali may help to enhance your experience of the customs and offer you some ideas on how the customs contribute to the family unity and harmony. 

Through this article, we will understand about the rituals, meanings and customs related to Bhavpurna Shradhanjali, and you will be able to know how important it is in the Marathi society.

You can also read: Dasara wishes in Marathi

Bhavpurna Shradhanjali In Marathi

Bhavpurna Shradhanjali in Marathi
Bhavpurna Shradhanjali in Marathi

कष्टातून संसार फुलविला,

उरली नाही साथ आम्हाला,

आठवण येते क्षणा-क्षणाला…

आज हि तुमची पाहतो वाट,

यावे पुन्हा जन्माला…!

|| भावपूर्ण श्रद्धांजली ||

 

सगळे म्हणतात की,

एक मित्र गेल्याने दुनिया संपत नाही

आणि ती थांबतही नाही…

पण हे कोणालाच कसे समजत नाही की,

लाख मित्र असले तरी

त्या एकाची कमी कधी पूर्ण होऊ शकत नाही.

भावपूर्ण श्रद्धांजली!

 

एकही दिवस जात नाही तुझी आठवण येत नाही

कितीही वर्ष झाली तरी तुझ्या आठवणी काही जात नाही

गेलास तू सोडून झाले होते आम्हाला दु:ख

पण अजूनही नाही होत तू सोडून गेल्यावर विश्वास

आठवणीत राहशील तू माझ्या कायम

पुन्हा येशील का परत? असा भाबड्या मनाला पडतो प्रश्न

आठवण तुझी आली दाटून

डोळ्यात आले पाणी, तुझ्याशिवाय राहू कसे आता सांग तू तरी.

भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ

भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ
भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ

तो हसरा चेहरा, नाही कोणाला दुखवले |

मनाचा तो भोळेपणा, नाही केला मोठेपणा |

सोडूनी गेला अचानक… नव्हती कुणालाही याची जाण |

पुन्हा परतूनी यावेस हीच आमची अपेक्षा |

देव तुझ्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना…

भावपूर्ण श्रद्धांजली

 

हा तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंग आहे.

हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर तुम्हाला देवो…

मृत आत्म्यास शांती लाभो…

 

काही जण आयुष्यातून कधीच जाऊ नये अशी वाटतात.

……………. सगळं लहानपण तुमच्यासोबत गेलं.

आता तुमच्याशिवाय एकही क्षण घालवणे कठीण आहे.

तुमच्या आत्म्यास शांती लाभो.

Bhavpurna Shradhanjali Quotes In Marathi

आज ………….आपल्यामध्ये नाहीत.

त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो…

हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

भावपूर्ण श्रद्धांजली

 

आज सकाळीच तू पुन्हा आलीस स्वप्नात

हळूच मला जवळ घेऊन तू उठवून गेलीस मला

तू नाहीस हे कळल्यावर उठायचे नव्हते जागेवरुन

पुन्हा ये ना गं परतून

घराचे दरवाजे आजही उघडे आहेत,

तू येशील अशी माझ्या मनाला एक आस आहे.

 

आता सहवास नसला तरी स्मृति सुगंध देत राहील,

जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहील.

भावपूर्ण श्रद्धांजली

 

जे झाले ते खूप वाईट झाले.

यावर विश्वासच बसत नाही.

देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो

आणि त्यांच्या परिवाराला

या दुःखद घटनेतून सावरण्याची शक्ती देवो.

भावपूर्ण श्रद्धांजली स्टेटस

भावपूर्ण श्रद्धांजली स्टेटस
भावपूर्ण श्रद्धांजली स्टेटस

आज तुझ्या आठवणीने फार गहिवरुन येत आहे.

तुझी आठवण आल्याशिवाय एकही दिवस जात नाही…

भावपूर्ण श्रद्धांजली

 

आठविला सहवास तुझा

पापणी माझी ओलावली,

परत येईल यासाठी आमची मने आसुसली.

 

जाणारी व्यक्ती आपल्यानंतर

एक अशी पोकळी निर्माण करून जातात,

जी भरून काढणे कधीही शक्य नसते…

देव तुमच्या आत्म्यास शांती देवो…

||भावपूर्ण श्रद्धांजली ||

 

आता सहवास नसला तरी,

स्मृती सुगंध देत राहील…

जीवनाच्या प्रत्येक वळणावर

आठवण येत राहील…!

Bhavpurna Shradhanjali In Marathi Text

आई बाबांचा होता तू लाडका,

नाही कोणी त्यांना तुझ्यासारखा,

माघारी परतून येरे माझ्या पाखरा

एक तूच तर होता त्यांच्या जीवनाचा आसरा…

 

मृत्यूने कदाचित आपल्यापासून दूर नेले असेल,

परंतु माझ्या जीवनाचा नायक तू कायमचा आहेस…!

 

काळाचा महिमा काळच जाणे,

कठीण तुझे अचानक जाणे…

आजही घुमतो स्वर तुझा कानी,

वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी…

|| भावपूर्ण श्रद्धांजली ||

 

शून्यामधुनी विश्व निर्मुनी,

किर्तीसुगंध वृक्ष फुलवुनी…

लोभ, माया, प्रीती देऊनी,

सत्य सचोटी मार्ग दावूनी…

अमर जाहला तुम्ही जीवनी…!

Bhavpurna Shradhanjali

असा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा ।

गंध संपला तरी सुगंध दरवळत राहावा ।।

भावपूर्ण श्रद्धांजली

 

मृत्यू हे अंतिम सत्य आणि शरीर हे नश्वर आहे. 

तरी देखील मन … जाण्याचे दु:ख सहन करु शकत नाही. 

त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच अपेक्षा

 

आता सहवास नसला तरी स्मृति सुगंध देत राहील, 

जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहील. 

भावपूर्ण श्रद्धांजली

 

देव मृत आत्म्यास शांती देवो

कुटुंबास हा आघात सहन करण्याची ताकद देवो

भावपूर्ण श्रद्धांजली

 

तुझे जाणे मला कायमचे दु:ख देऊन गेले

आता केवळ तुझ्या आठवणींचाच आधार आहे

भावपूर्ण श्रद्धांजली 

भावपूर्ण श्रद्धांजली वाक्य

भावपूर्ण श्रद्धांजली वाक्य
भावपूर्ण श्रद्धांजली वाक्य

माझ्या आठवणींच्या कप्प्यात तू आजही अशीच आहे… 

आई आज आमच्यात नाहीस यावर विश्वासच बसत नाही.

भावपूर्ण श्रद्धांजली 

 

आई आजही तुझ्या मायेची उब मला जाणवते… 

घरातील प्रत्येक गोष्ट बघून तुझी खूप आठवण येते… 

भावपूर्ण श्रद्धांजली 

 

नि:शब्द… 

भावपूर्ण श्रद्धांजली.. 

देव मृतात्म्यास शांती देवो

 

अस्वस्थ होतयं मन

अजूनही येते आठवण बाबा 

तुझ्या कर्तृत्वाचा सुगंध 

दररोज दरवळत राहो 

हीच ईश्वरचरणी प्रार्थना

भावपूर्ण श्रद्धांजली

 

बाबा तू निघून गेलास तरीही आजही जवळ आहेस.. 

माझ्या आठवणींच्या कप्प्यात तुझी जागा सदैव खास आहेस…

भावपूर्ण श्रद्धांजली

 

जीवन हे क्षणभंगुर आहे

हे तुझ्या जाण्यानंतर मला कळले

देव तुझ्या आत्म्यास शांती देवो

Conclusion

Bhavpurna Shradhanjali in Marathi is an emotional offering to our dear deceased ones so that we could offer all our respects and love to the deceased. It is a very important ritual of the Marathi culture which enforces the values of remembrance and gratitude. 

With this observance, families get united to commemorate the memories that their ancestors had and in this way, they get to ensure that the legacies of their ancestors keep on living in the hearts of future generations.