Marathi jokes are very charming and capable of brightening up a situation in an instant, putting a smile on the lips of anyone. These jokes, based on the great culture and traditions of the State of Maharashtra, tend to reflect the kind of details in our daily lives, thus making them relatable to the masses.
Knowing the nature of Marathi humour goes beyond simply appreciating the rich culture; it helps you get to know the people better. In the following article, we will find out about the importance of Marathi jokes, their origins, and where they are headed today.
You can also read: Marathi love quotes
भन्नाट मराठी जोक

नवरा तिच्या गरोदर बायकोला दवाखान्यात घेऊन जातो.
तेवढ्यात एक माणूस विचारतो – तुमची बायको आहे काय?
नवरा – हो…!
माणूस – प्रेग्नंट आहेत काय?
नवरा (चिडून) – नाही नाही…
कोण म्हणाले…! तिने तर फुटबॉल गिळलाय…!
पोलीस – काय रे कुठे चाललाय एवढ्या रात्री…?
बंड्या – प्रवचन ऐकायला…
पोलीस – कोणत्या विषयावर प्रवचन आहे…?
बंड्या – दारूपासून होणारे दुष्परिणाम
पोलीस – एवढ्या रात्री कोण देत प्रवचन…?
बंड्या – माझी बायको…
यजमान – आम्ही दार्जीलिंगचा चहा वापरतो
पुणेकर – वा , तरीच छान थंड होता. . .
किमान शब्दात कमाल अपमान…
दोन मित्र फोनवर बोलत असतात.
पहिला – Hello भाई काय करतोस…?
दुसरा – मस्त रे एकदम, काय म्हणतोस…?
पहिला – अरे एक काम होते.
दुसरा – हा कर मग,
थोड्या वेळाने निवांत बोलू.
पूर्वी मी खूप कष्टाळू होतो.
आता
कष्ट टाळू झालोय…
बायको – नेहमी माझं अर्ध डोक दुखत राहते.
वाटतंय डॉक्टरला दाखवायला हवं…
नवरा – अरे त्यात काय दाखवायचं…!
जितकं आहे तितकंच दुखणार ना…!
बस्स…! तेव्हापासून नवऱ्याचे संपूर्ण अंग दुखत आहे.
तीन उंदीर गप्पा मारत असतात.
पहिला – मी विषारी गोळ्या आरामात चघळतो.
दुसरा – मी पिंजऱ्यातील पनीर आरामात खाऊन बाहेर येतो.
तिसरा लगेच उठतो आणि जायला लागतो,
पहिला आणि दुसरा विचारतात,
काय झालं कुठ चालला…?
तिसरा – आलोच, मांजरीचा कीस घेऊन…
भक्त – देवा,
मी पापी आहे.
मला दुःख द्या.
दर्द द्या. मला बरबाद करून टाका.
माझ्यामागे भूत सोडा…
देव – नाटक का करतोयस…!
सरळ सरळ सांग ना, तुला बायको पाहिजे.
एक भिकारी देवाला म्हणतो…
हे देवा मला खाण्यासाठी असं काहीतरी दे जे,
खाल्ल्यावरसुद्धा संपले नाही पाहिजे…
देव – हे घे पूर्ण एक चिंगम…
नवरा – माझ्या छातीत खूप दुखायला लागलंय…
ताबडतोब अँब्युलंसला फोन लाव…
बायको – हो लावते, तुमच्या मोबाईलचा
पासवर्ड सांगा बर…!
नवरा – राहू दे, थोडं बर वाटतंय आता…!
Funny Jokes In Marathi

बायको – बाजूला व्हा,
कामाच्या वेळी पप्पी घेत जाऊ नका…
आतून कामवालीचा आवाज –
“सांगा जरा त्यांना,
मी सांगून सांगून थकले…!
(नवरा वारीला निघालाय…!)
आज जवळपास 50 सेल्फी घेतल्यानंतर,
मला समजलं की,
मनाच्या सौदर्यापेक्षा महान काहीच नाही
म्हणून, मी ते सर्व फोटो डिलीट केले…!
नखं कापल्यावर जो
स्टीलच्या डब्याचे घट्ट बसलेलं
झाकण उघडण्याची हिम्मत ठेवतो,
तो आयुष्यात काहीही करू शकतो…!
हे बघ भाऊ,
अरेंज मॅरेज म्हणजे…?
गुपचूप भांडी घासणे…
आणि
लव्ह मॅरेज म्हणजे..?
प्रेमाने भांडी घासणे…!
पण भांडी घासावी लागतात म्हणजे लागतातच…
“पोरगं बाहेर गावी राहतंय,
मग काय मज्जाच मज्जा करत असणार…
असं
म्हणणाऱ्यांना एक महिना सक्तीने मेसचं जेवण
खाऊ घालायला पाहिजे…
मग कळेल, कि 10 रुपयांचा वडापाव एवढा का
फेमस आहे ते…!
देव – बाळा काय पाहिजे ते माग…
मुलगा – एक सुंदर बायको…
देव – जर तू मुस्लीम असशील तर,
तुला कतरिना मिळेल,
हिंदू असशील तर दीपिका,
आणि
ख्रिश्चन असशील तर जॅकलिन देईन.
बोल तुझ नाव काय…?
मुलगा (विचार करून) – अब्दुल तुकाराम डिसोजा…
देव – लई दीड शहाणा दिसतोय…
याला शांताबाई द्या रे…!
तुमचा मुलगा न सांगताही अचानक प्रसाद
वाढायला पुढे पुढे जाऊ लागला
की,
समजायचं
होणारी सुनबाई आरतीला
आली आहे.
समोरचा जर
तंबाखू, सुपारी किंवा विमल थुंकून
बोलणार असेल…..
तर समजून जा काहीतरी ज्ञानाची गोष्ट
सांगणार आहे…!!!
बायको – अहो, उठा,
मला करंज्या तळायच्या आहेत.
नवरा – मग, मी काय
कढईत झोपलो आहे का…?
पुण्यात कॉलेजला जाताना रस्त्यावर
प्रियकर प्रेयसीला म्हणतो, – प्रिये, मला
तुझ्या डोळ्यात सगळ जग दिसतंय…
तेवढ्यात बाजूने जाणारा एकजण विचारतो, –
अरे मग तेवढं पुढच्या चौकात ट्राफिक आहे का
तेवढं बघून सांग रे…!
आजकाल 8 वी 9 वीची पोर
सर्रास सिगरेट ओढतात
आणि
आम्ही एक होतो….
बोर पण सांभाळून खायचो,
पोटात झाड येईल या भीतीने…!!!m
मराठी जोक्स

काल एकाला उधारी मागण्यासाठी
घरच्या लँडलाईन वर फोन केला,
तर तो म्हणतो,
“अरे यार, थोडा वेळाने फोन कर…
मी आता गाडी चालवतोय…..”
एका लग्नाच्या कार्यालयात एका माणसाला
मुलीकडचे विचारतात, “तुम्ही वर पिता का ?”
उत्तर – तसं काही नाही.
खाली व्यवस्था केली असेल तरीही चालेल…
बायको तिच्या मैत्रिणीला – अग काल दिवसभर नेट चालत नव्हते…
मैत्रीण – मग काय केले…?
बायको – काही नाही ग, नवऱ्याबरोबर गप्पा मारत होते.
चांगला वाटला ग स्वभावाने…
बायको – तुम्ही काल खूप प्यायला होता.
नवरा – नाही गं.
बायको – तुम्ही नळापाशी बसून म्हणत होता,
रडू नको सगळं ठीक होईल…
नवरा – साजणी, तुझ्या केसांच्या मखमली
जाळ्याला सांभाळत जा ग जरा…
बायको (लाजत) – तुम्ही पण ना…
इश्श…
नवरा – आई शप्पथ…
जर पुन्हा जेवणात तुझा केस सापडला ना,
तर साजणीवरून गजनी बनवून टाकेल तुला…
एक माणूस खड्डे बनवत होता; मागून दुसरा बुजवत येत होता…
एकाने असाच प्रश्न विचारला, तुम्ही हे काय करताय…??
तर ते म्हणाले, “हा सरकारी वृक्षारोपणाचा उपक्रम आहे..
मला खड्डे बनवण्याचे आणि याला बुजवण्याचे काम दिलेले आहे.
मध्ये झाड लावणारा आज रजेवर आहे.
आम्ही आमचे काम करत आहोत…
माणूस – साहेब माझी बायको हरवलीय ….
हे बघा हे पोस्ट ऑफिस आहे,
पोलिस स्टेशन नाही…
तक्रार द्यायला पोलीस स्टेशन मध्ये जा ….
माणूस – च्यायला, आनंदाच्या भरात कुठे जाऊ तेच कळत नाही…
Marathi Joke
डॉक्टर (संताला) – सांगण्यास वाईट वाटतंय कि,
तुमची एक किडनी फेल झाली आहे…!
हे ऐकल्यावर संता खूप रडतो…
मग तो शांत होऊन डॉक्टरला विचारतो…
किती गुणांनी…?
भांडण केल्यावर कधी आठवलं का कि…
अरे यारं, आपण हा पॉईंट तर बोललोच नाही…
संता पोलिसात भरती होतो…
एकदा तो पोलीस इन्स्पेक्टरला फोन लावतो…
संता – साहेब, इथं एका महिलेने आपल्या
पतीला गोळी मारून त्याचा खून केलाय…!
पोलीस इन्स्पेक्टर – का…?
संता – तिने पुसलेल्या फरशीवरून तो चालत गेला, म्हणून…
पोलीस इन्स्पेक्टर – मग त्या महिलेला अटक केली का नाही…?
संता – नाही …अजून फरशी थोडीशी ओली आहे…!!!
एक दारुड्या लोळून गाणी म्हणत असतो.
मग तो उलटा होऊन परत गायला सुरुवात करतो.
शेजारून चाललेला एक माणूस – हे काय?
दारुड्या – कॅसेटची दुसरी बाजू लावलीय…
पेशंट – डॉक्टर साहेब , तुम्ही सांगितल्या पासून दारू पित नाही ,
फक्त कोणी आग्रह केला तरच घेतो ?????
डॉक्टर – हे कोण तुमच्या बरोबर ?
पेशंट – ह्यालाच ठेवलाय आग्रह करायला…!!!
शिक्षक – “मी तुझा जीव घेईन”
याच इंग्रजीत भाषांतर कर…
पप्पू – ते इंग्रजी गेलं उडत…
तुम्ही हात तरी लाऊन बघा…
दोन वाघ झाडाखाली आरामात बसले होते….
समोरून एक ससा जोरात पळून गेला….
पहिला वाघ ( दचकून ):- आयला, काय गेलं रे….?
दुसरा वाघ :- काही नाही रे, फास्ट फूड होत……
मराठी विनोद

शाळेत इंग्लिश चे लेक्चर चालू असते.
मास्तर – गण्या “It” केव्हा वापरतात?
गण्या – घर बांधताना…!
(लई चोपला मास्तरांनी)
किती सुंदर होते ते लहानपणीचे दिवस…
फक्त दोन बोटे जोडली कि,
“दोस्तीला पुन्हा सुरुवात व्हायची…”
आता क्वार्टर पाजल्याशिवाय दोस्ती होतच नाही…
माजले साले दूसर काही नाही…!!!
नोकर – साहेब मला केराच्या टोपलीत
शंभराच्या पाच नोटा सापडल्या, ह्या घ्या.
मालक – मीच फेकून दिल्या होत्या, नकली आहेत त्या…
नोकर – म्हणूनच परत करीत आहे…!
हॉलीवूड आणि बॉलीवूडची Acting एकीकडे
आणि
नातेवाईकांकडे पैसे उसने मागितले तर,
त्यांची Acting एकीकडे…
(दोन्हीही पाहण्यासारख्या असतात…)
एक मतदार वोटिंग मशीन समोर बराचवेळ उभा असतो
मतदान अधिकारी – काय झालं?
मतदार – रात्री कुणी पाजली त्याचं नावंच आठवत नाहीये…!
माझ्या फार्मवर लावणीचा कार्यक्रम आयोजित केल्याचे
कळल्यावर लांबून लांबून बरेच मित्र गाडया करून आले…
त्यांच्याकडून व्यवस्थित भात-लावणी करुन घेतली.
सगळे मला जाताना शिव्या देऊन गेले.
माझं काय चुकलं ??
एक मुलगा देवाला विचारतो, “तिला गुलाबाच फुल का
आवडतं…? ते तर एका दिवसात मारून जातं…!
मग तिला मी का आवडत नाही…?
मी तर तिच्यासाठी रोजच मरत असतो…!
देव उत्तर देतात, “जाम भारी रे, एक नंबर…
Whatsapp वर स्टेटस ठेव…
Conclusion
The Marathi jokes not only entertain the people but also signify the immense cultural heritage of Maharashtra. These jokes tend to be the best way to describe life in real time, indicating the kind of humour in those day-to-day events and relations.
These jokes, once told and laughed at, reconnect to our roots and with it comes that community of Marathi-speaking people. Moreover, it is a brilliant medium to learn the language and culture of non-Marathi people in a non-serious tone.
